मेट्रो- ३ च्या बीकेसी स्टेशनला आग; मेट्रोच्या फेऱ्यांना स्थगिती

प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

मेट्रो- ३ च्या बीकेसी स्टेशनला आग; मेट्रोच्या फेऱ्यांना स्थगिती

मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्थानकामध्ये आग लागल्याची घटना घडली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या ही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगीचे वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मेट्रो स्थानकात लागलेल्या आगीनंतर परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली असून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या. प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई अग्निशमन दल सक्रियपणे परिस्थिती हाताळत असून आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विझवण्याचे काम करत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि DMRC चे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन्सची देखरेख करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी साइटवर उपस्थित आहेत.

हे ही वाचा : 

शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास आग लागली. सुमारे ४० ते ५० फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

Exit mobile version