मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे.कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे.
भाजपच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात ही आग लागली.आज रविवार असल्याने कार्यालय बंद असते, त्यामुळे कार्यालयात डागडुजीचे काम सुरु होते.किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागली.शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
हे ही वाचा:
‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’
जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा शत्रू, ९ वर्षांनंतर छोटा राजनचे फोटो आले समोर!
शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’
पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे भाजपनेते प्रसाद लाड यांनी सांगितले.प्रसाद लाड म्हणाले की, कार्यालयाला कोठेही आग लागलेली नाही, आतमध्ये असलेल्या छोट्या मंडपाला ही आग लागली.निवडणुकीचे कामकाज सुरु असल्याने थोडी फार कागदपत्रे होती त्यामुळे आगीने पेट घेतला.मात्र, अग्निशमन दलाच्या पथकाने जलद गतीने येऊन आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाचे आणि महापालिकेचे त्यासाठी आभार.जास्त काही नुकसान झालेलं नसून, छोटे-मोठे टेबल, खुर्च्या आणि थोडीफार कागदपत्रे जळाली आहेत.राहुल नार्वेकर यांच्यासोबत सर्वत्र कार्यालयात आम्ही पाहिले, जास्त काही नुकसान झालेलं नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.