28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषभाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यांवर एफआयआर!

भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ‘आप’ कार्यकर्त्यांवर एफआयआर!

आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप

Google News Follow

Related

भाजप मुख्यालयावर निषेध मोर्चा काढल्यानंतर एका दिवसानंतर दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीडीयू मार्गावर कलम-१४४ लागू असूनही आम आदमी पक्षाने निदर्शनासाठी परवानगी मागितली नव्हती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीसी कलम-१८८ (अधिकाऱ्याच्या आदेशाची अवज्ञा) अंतर्गत आयपी इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाण्याची घोषणा करून भाजपला अटकेचे आव्हान दिले होते.

हे ही वाचा:

राऊतांची रडारड; म्हणे जिथे ‘उबाठा शिवसेने’ला भरघोस मतदान होऊ शकेल तिथेच कासव गतीने यंत्रणा सुरू

बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!

फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!

इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा, संदीप पाठक, आतिशी आणि पक्षाचे इतर नेते, खासदार आणि आमदार भाजप मुख्यालयाकडे कूच करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले.यावेळी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मोर्चा काढून आदेशांचे उल्लंघन केले आहे.आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा