31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषएनसीसी कॅडेट मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा

एनसीसी कॅडेट मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा

पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती

Google News Follow

Related

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांत यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेला. ज्या सीनियरने या कॅडेट्सना मारहाण केली त्याचेही निलंबन करण्यात आले आहे.

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रांगणात प्रशिक्षण देण्यात येते.  या प्रशिक्षणावेळी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मारहाण करणाऱ्या युनिट हेडचा पोलिसांनी जबाब नोंदविला. महाविद्यालय प्रशासनचाही जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.

हे ही वाचा:

नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता

वसुलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही

या मारहाणीविरोधात विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या घटनेसंदर्भा समिती नेमण्यात येईल. त्याअंतर्गत दोषी व्यक्तींवर कारवाई कडक करण्यात येईल. याप्रकरणी एनसीसीने निवदेन जारी केले आहे. या व्हिडिओविषयी एनसीसीने म्हटले आहे की, एनसीसी प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुष कारवाई करण्यात येत आहे. ही कृती निंदनीय आहे. हा कोणत्याही एनसीसी प्रशिक्षणाचा भाग नाही. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या विद्यार्थ्याला महाविद्यालयाने निलंबित केलेले आहे. गुन्हेगार कॅडेटच्या या कृतीमुळे एनसीसी व्यथित झाली आहे. एनसीसीमध्ये आम्ही आमच्या कॅडेट्समध्ये सामाजिक मूल्ये आणि लष्करी नैतिकता बिंबवतो. परंतु या कृतीला त्यात कोणतेही स्थान नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा