लेखक देवदत्त पटनायक विरोधात तक्रार!

लेखक देवदत्त पटनायक विरोधात तक्रार!

पौराणिक कथांचे विश्लेषक आणि लेखक देवदत्त पटनायक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिराबाबत खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

देवदत्त पटनायक हे ट्विटर वर फारच सक्रिय असुन कायमच वादग्रस्त ट्विट्स साठी चर्चेत असतात. ३ जानेवारी रोजी असेच एक वादग्रस्त ट्विट पटनायक यांनी केले होते. या ट्विट मध्ये त्यांनी दलित समाजातील व्यक्तींना पुरीच्या मंदिरात प्रवेश मिळत नाही असे म्हटले होते. या ट्विटसाठी पटनायक यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवून भगवान जगन्नाथ यांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे, जातीय आधारावर समाजात फूट पाडून तेढ निर्माण करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओडिशाच्या श्री जगन्नाथ संस्कृती सुरक्षा परिषदेने ही तक्रार दाखल केली आहे.

श्री जगन्नाथ संस्कृती सुरक्षा परिषदेचे अनिल बिस्वाल यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. पटनायक यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५अ, ५००, ५०५ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पटनायक यांनी आता त्यांचे वादग्रस्त ट्विट डिलीट केली आहे. 

Exit mobile version