मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी एकीकरण समितीने या होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून नयानगर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
मीरा रोडमध्ये मराठी नागरिकांना घरे नाकारली जात होती. केवळ गुजराती, मारवाडी, जैन या लोकांनाच घर विकायचे असून मराठी नागरिकांना परवानगी नाही, असे सांगितले जात होते. संबंधित प्रकरणाची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. त्यामुळे मराठी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची दखल घेऊन मराठी एकीकरण समितीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.
हे ही वाचा:
न्हावा शेवा बंदरात सापडलेले २५ किलो हेरॉइन आले अफगाणिस्तानातून
गुटखा खाण्याबद्दल दंड वसूल करणारा निघाला तोतया पालिका कर्मचारी
‘ज्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे, त्या खासगी कंपन्याच होत्या!’
मराठी कलाकार देणार क्रिकेट लीगच्या माध्यमातून गरजू मुलांना मदतीचा हात
गोवर्धन देशमुख हे २०१० पासून मीरा रोडमध्ये घर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार त्यांनी कांदिवली येथील एका व्यक्तीची घर विक्रीची जाहिरात पहिली. त्या व्यक्तीला फोन करून घर खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, समोरील व्यक्तीने त्यांच्या सोसायटीमध्ये मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन यांना घरे देत नसल्याचे सांगितले. सोसायटीमध्ये केवळ मारवाडी, जैन, गुजराती लोकांनाच घर विकले जात असल्याचे सांगितले. तसेच देशमुख यांना किंवा इतर कोणत्या मराठी व्यक्तीला घर विकल्यास इतर घरे विकली जाणार नाहीत, असे त्या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या मित्रांना हे प्रकरण सांगून पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी देशमुख यांची ही तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या मराठी द्वेष्ट्यांवर कलम १५३अ अंतर्गत गुन्हा दाखल. #मीरारोड
यांना फक्त गुजराती, मारवाडी,जैनांना घर विकायचे आहे,
"मराठी माणूस नॉट अलावूड"यापुढे सर्वत्र गुन्हे नोंद होणार!#मराठीएकीकरणसमिती@news_lokshahi@SaamanaOnline@zee24taasnews @News18lokmat pic.twitter.com/rxfHrTMcdH
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) October 10, 2021
आज मीरा रोडमध्ये मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यापुढे राज्यातही मराठी माणसाला घरे नाकारल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील, असे देशमुख यांनी सांगितले.