लाल महालातील लावणीने गदारोळ

लाल महालातील लावणीने गदारोळ

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लाल महालात नृत्यांगना वैष्णवी पाटील हिला लावणी करणे महागात पडले आहे. वैष्णवी पाटील हिने काही दिवसांपूर्वी लाल महालात लावणीचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर काहींनी या व्हिडीओला आक्षेप घेतला. त्यानंतर वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर वैष्णवी पाटील हिने जाहीर माफी मागितली.

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील थिरकताना दिसली. मात्र, ऐतिहासिक आणि पवित्र अशा लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी नाचाल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर वैष्णवी पाटीलसह मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यांनी हे गाणं लाल महालात शूट केलं. तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई

लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र, तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शूट केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर वैष्णवी पाटील हिने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. तसेच यासंदर्भात आपला निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघानं जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. तसेच, ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे.

Exit mobile version