25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषवसई दरड दुर्घटनेप्रकरणी जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वसई दरड दुर्घटनेप्रकरणी जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

वसई पूर्वेतील वाघरळ पाडा येथे बुधवार, १३ जुलै रोजी सकाळी एका बैठ्या चाळीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अमित सिंग (३५) आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१५) यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन चाळ बिल्डरांविरोधात एमआरटीपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दुर्घटनेनंतर बिल्डर फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पालिकेने दिलेल्या तक्रारीनंतर या दुर्घटने प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मितवा रिॲल्टीच्या अजित सिंग उर्फ मटू या चाळ बिल्डरने ही चाळ बांधली होती. ही जागा मेरी ग्रेशीअस या महिलेकडून विकत घेतली होती. या दोघांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र नगररचना प्रांतिक अधिनियमन (एमआरटीपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या परिसरातील शैलेश निषाद, रतनेश पांडे आणि अनिलकुमार दुबे यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३, ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

या दुर्घटनेत सहा जण अडकले होते. वसई विरार अग्निशमन दलाने बचाव कार्य करत चार  जणांना सुखरूप बाहेर बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा