दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टात हा खटला सुरु असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी न्यायालयात होणार आहे.
तक्रारदार शिवकुमार सक्सेना यांनी न्यायालयात पुरावे सादर केले की द्वारका परिसरात आम आदमी पक्षाचे मोठे पोस्टर्स आणि बॅनर बेकायदेशीरपणे लावण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि म्हटले की बेकायदेशीर होर्डिंग्ज केवळ शहराचे सौंदर्य बिघडवत नाहीत तर वाहतुकीलाही धोका निर्माण करू शकतात. दिल्ली प्रॉपर्टी डिफेसमेंट ॲक्ट, २००७ च्या कलम ३ अंतर्गत हा खटला गुन्हा मानला गेला आहे.
बेकायदेशीर होर्डिंग्ज पडल्याने लोकांचा मृत्यू होणे ही देशात नवीन गोष्ट नाही, त्यामुळे यावर कठोर कारवाई करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त, माजी आमदार गुलाब सिंह आणि माजी नगरसेवक नीतिका शर्मा यांच्याविरुद्धही एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात अनुपालन अहवाल दाखल केला आणि एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती दिली.
हे ही वाचा :
कर्नाटक: औरंगजेब आणि टिपू सुलतानचा फोटो शेअर करत काँग्रेस नेत्याची वादग्रस्त पोस्ट!
यूएईच्या राष्ट्रपतींकडून ईदची भेट, ५०० भारतीयांसह १५०० हून अधिक कैद्यांची सुटका!
गाझामध्ये इस्रायली हल्ला, हमास प्रवक्त्यासह सात जण ठार!
महायुतीतील कोणता नेता वक्फ बोर्डावर प्रसन्न ?
हे संपूर्ण प्रकरण सुमारे ५ वर्षे जुने आहे. २०१९ मध्ये, द्वारकेमध्ये मोठमोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आता न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.