आता व्हॉट्सऍपवर शोधा जवळचे लसीकरण केंद्र

आता व्हॉट्सऍपवर शोधा जवळचे लसीकरण केंद्र

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गती आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कोरोना हेल्प डेस्कची सुरुवात करण्यात आली असून या चॅटबॉटमध्ये काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा वापर करुन व्हॉट्सऍपच्या माध्यमातून आता लोकांना आपल्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे.

सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर मायगोव कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटसाठी आवश्यक असलेला ९०१३१५१५१५ हा नंबर सेव्ह करा. व्हॉट्सऍपवरुन या नंबरला नमस्ते किंवा हाय असं टाईप करा. मेसेज टाईप करताच आपल्याला ऑटो रिस्पॉन्स मिळेल. त्यामध्ये एक प्रश्नावली असेल. या प्रश्नावलीमध्ये आपण आपल्या पीन कोडची नोंद करा. पीन कोड नोंद केल्यानंतर आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती आणि लोकेशन आपल्याला मिळेल.

या पद्धतीने आपण आपल्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्राची माहिती व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मिळवू शकता. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर करता येईल.

हे ही वाचा:

आदु… आता तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन

शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते

लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये २० हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे.

Exit mobile version