अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सलग सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पात ९ प्राधान्यांवर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. यामध्ये रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. सरकारने ५ वर्षात टॉप ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचे घोषित केले आहे. यामध्ये मानधन म्हणून ५ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे.
रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित ५ योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील पाच वर्षांसाठी ४.१ कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरता नागरिकांना कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यांनी १.४८ कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.
यामधून २० लाख तरुणांना कुशल केलं जाणार आहे. तसेच एकूण १००० औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपग्रेड केल्या जातील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘मोदी 3.0 सरकार’च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १.५२ कोटी
कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची तोडफोड; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न