चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला

दिल्लीच्या विमानतळ, हॉटेलमध्ये संघाचे जल्लोषात स्वागत

चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला

आयसीसी टी- २० वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकून पडला होता. तिथे आलेल्या चक्रीवादळामुळे विमानसेवा बंद असल्या कारणनारे भारतीय संघ मायदेशी परंतु शकत नव्हता. पण अखेर क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी पोहचला आहे.

भारतीय संघाचे सर्व खेळाडू हे नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. भारतीय संघाने बार्बाडोस ते नवी दिल्ली हा १५ तासांचा प्रवास केला. बीसीसीआयने संघासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते. भारतीय संघ विमानतळावर कधी पोहचतेय, याची क्रिकेट चाहते मध्यरात्रीपासून वाट पाहत होते, अखेर भारतीय संघ विमानतळावर पोहचला.

हे ही वाचा:

हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने

भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद

वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”

यानंतर भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. खेळाडूंनीही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर भारतीय संघ विमानतळावरुन हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. हॉटेलमध्येही संघाचे ढोल वाजवून स्वागत केलं गेलं. हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यानंतर हॉटेलमधून तयार होऊन भारतीय संघ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाणार आहे. त्यांच्यासोबत सकाळच्या नाश्त्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानंतर भारतीय संघ मुंबईसाठी रवाना होणार आहे. पुढे मुंबईत विजयी रॅली निघणार आहे. सायंकाळी ५ वाजता मरीन ड्राईव ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असणार आहे. यानंतर वानखेडे मैदानात भव्य कार्यक्रम आणि खेळाडूंचा कौतुक सोहळा पार पडणार आहे.

Exit mobile version