परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे इडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शाहजहानला अटक केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसने शेख याला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. खासदार डेरेक ओब्रायन यांनी हा निर्णय घेतला आहे.याबद्दल बोलताना ओब्रायन म्हणाले, आम्ही चर्चा करून शेखला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत, अशा नेत्यांना निलंबित करण्याचे धाडस भाजपने दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शाहजहान हा संदेशखळी विधानसभा मतदारसंघाचे निमंत्रक होते. तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या ताब्यातील उत्तर २४ परगणा जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. ५५ दिवस फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी तृणमूल कॉंग्रेसच्या या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.त्याला उत्तर २४ परगणा येथील मिनाखान भागातून उचान्यात आले. त्या ठिकाणी तो आपल्या साथीदारांसह लपला होता.
हेही वाचा..
धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन.
“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!
भारत आणि पाकिस्तान ९ जून रोजी भिडणार
कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणात कारवाई करण्यास उशीर झाल्याबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांवर टीका केली होती. या प्रकरणातील शाहजान शेखला अटक झाली पाहिजे असे सांगून न्यायालयाने त्यांना अटकेवर कोणत्याही प्रकारची स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर तीन दिवसांनी शाहजहानची अटक झाली आहे. संदेशखळी येथील मोठ्या संख्येने महिलांनी शाजहान शेख आणि त्याच्या समर्थकांवर जबरदस्तीने जमीन हडप आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. शेख आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेच्या मागणीसाठी नदीकाठच्या परिसरात महिनाभराहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.