औरंगाबाद जिल्यात प्रसिद्ध यूट्युबर बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यूट्युबरवर ती ‘बिंदास काव्या’ या नावाने प्रसिद्ध होती. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. पण ती अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आईवडील अस्वस्थ झाले होते. काव्याचा शोध घेऊनही ती सापडत नसल्याने तिच्या आई-वडिलाने समाजमाध्यमावर घरी परत येण्याचे आवाहन केले होते. पण काही तासा अगोदर काव्य लखनऊ मध्ये जाणाऱ्या ट्रेनमध्ये सापडली असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांनी दिली.
अभ्यास करण्यासाठी काव्याला तिचे आई-वडिल ओरडले होते. त्या रागातून काव्या घर सोडून निघून गेली होती. ट्रेनने ती लखनऊ या त्यांच्या मूळ गावी जात होती. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण आता काव्या सापडली असून, औरंगाबाद पोलिसांनी तिला लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमधून ताब्यात घेतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली आहे. तसेच बेपत्ता झालेल्या काव्याचा शोध लागल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी यूट्यूब वर लाईव्ह येत याची माहिती दिली.
हे ही वाचा:
विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी
चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे
राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा
याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?
काव्याचा यूट्यूबवर मोठा फॅन-फॉलोविंग असून ती गेमिंगसाठी ओळखली जाते व टिक-टॉक सारख्या माध्यमातून लिपसिंग सुद्धा करत असे, २०१७ मध्ये यूट्यूब चॅनेल सुरु केले असून, वयाच्या १६ व्या वर्षी युट्यूबवर तिचे ४०.५ लाख एवढे फॉलोअर्स आहेत. काव्या बेपत्ता झाल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलीस स्थानकात तक्रार केली होती. पोलीसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर काव्या इटारसी येथे रेल्वे मध्ये सापडली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून काव्याच्या चाहता वर्ग व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. काव्या यादव असे तिचे नाव असून, यूट्यूबसह इस्टाग्रामवरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.