देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा

मुंबईतील मतदान केंद्रांवर लांबच्या लांब रांगा

देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव सध्या देशभरात सुरू आहे. लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्पासाठी मतदान सुरू असून महाराष्ट्रातही सोमवार, २० मे रोजी सुरुवात झाली आहे. राज्यात हा अंतिम टप्पा असून सकाळपासूनच मतदानासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मतदान केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

पाचव्या टप्प्यासाठी ४९ जागांवर मतदान सुरू झालं आहे. या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचव्या टप्प्यात राज्यात १३ जागांचे भवितव्य निश्चित होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. देशपातळीवर विचार केल्यास या टप्प्यात आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात आहेत.

हे ही वाचा:

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू 

‘मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त, अहंकारी अन सर्वात मोठे बेईमान’

गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!

‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत’

राज्यातील अनेक निवडणुका या प्रतिष्ठेच्या होणार आहेत. मुंबईतील सहा जागांवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. येथे महायुती आणि महविकास आघाडी आमनेसामने असून याचा निकाल ४ जून रोजी समोर येणार आहे.

Exit mobile version