मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांना सुरूवात

मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांना सुरूवात

भारतात सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले आहे. या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा ४५० पेक्षा जास्त महाविद्यालये घेत असून पदवीच्या अंतिम वर्षाचे दिड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्व महाविद्यालये सज्ज झाली आहेत.

मुंबई विद्यापीठाने करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र ५ च्या परीक्षा डिसेंबर – जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या परीक्षा मे २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार या परीक्षा होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार ६ ते २१ मे २०२१ दरम्यान घेणार आहेत.

हे ही वाचा:

तामिळनाडूत स्टालिन राज सुरु

शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर

स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार ‘गांधी-नेहरू’

लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!

अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षा
पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६ च्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण ४५ परीक्षा आजपासून सुरु होत आहेत.

परीक्षेस अंतिम वर्षाचे १,५५,१५५ विद्यार्थी
सत्र ६ च्या या परीक्षेत बीकॉमचे सर्वाधिक म्हणजे ६८,१०१ विद्यार्थी बसत आहेत तर बीएमएसमधून १६,५०१, बीएमधून १४,५९२, बीएस्सीमधून १०,७७०, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स विषयासाठी १०,२५१, बीएस्सी आयटीकरिता ९७२० विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. यासह बीएमएम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज व इतर विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षेमध्ये १ लाख ५५ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहेत.

९४ समूह व ४५० महाविद्यालये
परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयाचे समूह तयार केलेले आहेत. प्रत्येक समूहामधील एका महाविद्यालयास प्रमुख महाविद्यालय म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे. अशा ९४ मुख्य महाविद्यालयांवर ही जबाबदारी सोपवली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या या परीक्षा मुंबई विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांच्या ९४ समूहांतील विभागणीद्वारे ४५० पेक्षा जास्त महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. १५ एप्रिल ते ५ मे २०२१ दरम्यान प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र २ ते ४ या नियमित व सत्र १ व ३ च्या पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षा यशस्वीरीत्या महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीनेच संपन्न झाल्या.

उन्हाळी सत्राच्या परीक्षा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील करियरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. कोविडच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे हे संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षणाचे होते व परीक्षा देखील ऑनलाईन होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.

-डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून ५०० पेक्षा जास्त परीक्षा घेत आहे. त्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. या उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version