गुजरातच्या गांधीनगरमध्ये झालेल्या ६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणबीर कपूरने पटकावला आहे. त्याला ऍनिमल चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट हिला ‘रॉकी और रानीकी प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी मिळाला. तर, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘१२वी फेल’ या चित्रपटाला मिळाला.
१२वी फेल चित्रपटासाठी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. तसेच, सर्वोत्कृष्ट पटकथा व संकलनासाठीही या पुरस्काराने बाजी मारली. तसेच, विक्रांत मेस्सी याला याच चित्रपटासाठी समीक्षकांच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
हे ही वाचा:
नितीश कुमार बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री
विंडीजच्या जोसेफने घेतले ७ बळी, गॅबावर ऑस्ट्रेलियाला केले पराभूत
चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!
इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!
समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जोरामला मिळाला. तर, समीक्षकांच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी हिला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्व्हेसाठी तर, ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटासाठी शेफाली शहा हिला मिळाला. डुंकी चित्रपटातील भूमिकेसाठी विकी कौशल याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शबाना आझमी यांना ‘रॉकी और रानीकी प्रेमकहानी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील तेरे वास्ते या गाण्यासाठी अमिताभ भट्टाचार्य यांना गौरवण्यात आले. तर, सर्वोत्कृष्ट संगीत आल्बमचा मान ऍनिमल चित्रपटाने पटकावला. याच चित्रपटातील अर्जन वेली या गाण्यासाठी भूपिंदर बब्बल याला सर्वोत्कृष्ट गायकाचा तर, पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी शिल्पा राव हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.