भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीवर लवकरच एक बायोपिक येत असून त्याचे नाव चकडा एक्स्प्रेस असे आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा या आगामी ” चकडा एक्सप्रेस ” चित्रपटात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. आणि हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
झुलन गोस्वामी ही जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांपैकी एक आहे. ” चकडा एक्स्प्रेस ” या चित्रपटात तिचा प्रवास दाखवण्यात आला आहे. गोस्वामीवर बायोपिक करण्याचे कारण म्हणजे क्रिकेट खेळण्याचे तिचे एकमेक स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला राजकारणामुळे निर्माण झालेल्या अगणित अडथळ्यांना न जुमानता तिने यशाचे शिखर गाठले आहे.
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या पोस्टवरील तिच्या दीर्घ कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘ ही एका महिलेची कहाणी आहे जिने जगातील महिला क्रिकेटचा इतिहास बदलला आणि अनेक महिलांना रूढीवादी विचार मोडून त्यांच्या स्वप्नासाठी झगडण्याची प्रेरणा दिली. हा खरोखरच खास चित्रपट आहे कारण तो भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या जीवनपटावर आधारित आहे.’
चकडा एक्स्प्रेसच्या टीझरमध्ये महिला क्रिकेटपटूंनी स्वतःच नाव लिहून पुरुष खेळाडूंची जर्सी घातलेली दिसते. त्यांच्यासाठी कोणतेही प्रेक्षक मैदानावर नसताना खेळण्यासाठी तयारी करत असल्याचे दाखवले आहे. चित्रपटात झूलनसारखी दिसण्यासोबतच अनुष्का तिच्या संवादांमध्ये बंगाली उच्चारांवरही प्रभुत्व मिळवत असल्याचे दिसते. या चित्रपटात प्रोसित रॉय आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
हे ही वाचा:
आतंकवाद्यांच्या निशाण्यावर रेशीमबाग
महाराष्ट्रात दोन वेगळे कायदे आहेत काय?
मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार
इसिसमध्ये मुस्लिम तरुणांना सामील करणाऱ्या त्या दोघांना ८ वर्षांची सजा
अनुष्कावर टीका
अनेक चाहत्यांनी जवळपास तीन वर्षांनी अनुष्का पडद्यावर दिसल्याने तिचे स्वागत केले. मात्र, गोरा रंग असलेल्या अभिनेत्रीला कास्ट करणे, तीच बंगाली उच्चारांवर प्रभुत्व नसणे, तसेच झुलनच्या भूमिकेसाठी बंगाली अभिनेत्रीला कास्ट न करणे यासारख्या कारणांमुळे तिच्यावर टीकाही केली जात आहे.