… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा

… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा

सध्या देशभरात चर्चा असलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांना आता सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असून देशभरातून या चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा १९९० च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे.

एकीकडे देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटावर टीका देखील केली जात आहे. समाज माध्यमांवर देखील टीका करणारे आणि कौतुक करणारे असे दोन गट पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. Y- दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत अग्निहोत्री यांना आठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षा पुरविली जाईल, ज्यात दोन कमांडो आणि पोलिस कर्मचारी असतात. त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान सीआरपीएफ कडून त्यांचे रक्षण केले जाणार आहे.

११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच ९७ कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर

या चित्रपटाला सुरुवातीला जास्त स्क्रीन्स आणि शो मिळाले नव्हते. त्यासोबतच सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची या चित्रपटाला स्पर्धा होती. त्यासोबतच अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ आणि आलिया भटचा ‘गंगुबाई काठियावाडी’ची पण स्पर्धा होती. तरीदेखील प्रेक्षकांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच या चित्रपटाचे शो वाढवणे भाग पडले.

Exit mobile version