26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरविशेषकाश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

खोऱ्यात १०० चित्रपटगृहे उघडण्यासाठी बँकांमध्ये कर्जाचा प्रस्ताव

Google News Follow

Related

कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या चार वर्षांत काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तसेच, खोऱ्यात चित्रपटसंस्कृती वाढू लागली आहे. दहशतवाद्यांच्या काळात बंद पडलेली चित्रपटगृहे पुन्हा उघडू लागली आहेत. आतापर्यंत खोऱ्यात एक मल्टिप्लेक्स आणि चार चित्रपटगृहे उघडली आहेत. चित्रपटप्रेमींच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर १०० चित्रपटगृहे उघडण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी बँकेमध्ये कर्जाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.

सन १९९०मध्ये दहशतवाद वाढू लागला तेव्हा हल्ल्यानंतर चित्रपटगृहे बंद पडली. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी चित्रपटगृहे उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांवर अंकुश आला. फुटीरतावाद्यांचा आवाज थांबला. दगडफेकही बंद झाली. या बदलत्या वातावरणातच सरकारच्या प्रयत्नांमुळे सन २०२१पासून शोपिया, पुलवामा, बारामुल्ला आणि हंदवाडामध्ये चित्रपटगृहे उघडली गेली.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्वतः चित्रपटगृहात पहिला शो बघून प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. या दरम्यान खोऱ्यातील पहिले मल्टिप्लेक्स श्रीनगरमध्ये उघडले. येथे तरुण-तरुणी रात्री उशिरापर्यंत बिनधास्त चित्रपटाचा आस्वाद घेत आहेत. सरकारने चित्रपटाचे नवे धोरणही जाहीर केले. आकर्षक सबसिडीचे प्रस्ताव दिले. बदलती परिस्थिती आणि हिंसाचारापासून दूर असणारे काश्मीर पुन्हा बॉलिवूडला खुणावू लागले. चित्रपटाचे नवे धोरण बनल्यानंतर सरकारने काश्मीरमध्ये ३००हून अधिक चित्रपटांच्या चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. यातील १००हून अधिक चित्रपटांचे चित्रिकरण श्रीनगरसह काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत झाले आहे. सरकारकडे अजूनही शूटिंगचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांनाही रोजगाराचे साधन मिळू लागले आहे.

चित्रपटगृहे उघडली परंतु विरोध नाही

चित्रपटगृहे उघडल्यानंतर कोणताही विरोध झाला नाही की कोणत्याही प्रकारच्या धमक्या मिळाल्या नाहीत. दहशतवाद्यांचा जोर असताना कोणीही चित्रपटगृह उघडण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता काश्मिरी नागरिक कुटुंबीयांसह चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत.

हे ही वाचा:

ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अपयशी

नवाब मलिक महायुतीत नको!

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधून दहशतवाद कमी झाला आहे. त्यामुळे येथे चांगले वातावरण तयार झाले आहे. दहशतवादाच्या ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच सन २०२१मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदा चित्रपटगृह उघडले. १००हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले. सुमारे १०० चित्रपटगृहांसाठी बँकेत कर्जाचे प्रस्ताव बँकांकडेव विचाराधीन आहेत.

– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा