व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदि सोशल मिडीयामध्ये आलेला व्हिडिओ पाहिला व ऐकला असता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील कार्यक्रमांमध्ये हिंदू देवदेवतांच्या व संत पुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह व वादग्रस्त विधाने केलेली आहेत. सदरची विधाने करताना त्याने पुढील प्रमाणे विधाने केलेले आहेत.
“धोब्याचं ऐकतो, बायको बाळंतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळंतपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे.” तसेच प्रभू रामचंद्राच्या घराण्याबद्दल व श्री ज्ञानेश महाराव यांनी त्याच भारतात स्वामी समर्थाच्या बाबतही बेताल विधाने करून श्री समर्थ भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत याचीही नोंद घ्यावी. हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून-बुजून आक्षेपारं आणि अश्लील विधाने केली आहेत. त्यामुळे आम्हा सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
हेही वाचा..
पंतप्रधानांकडून झारखंड, ओडिशा, बिहार, यूपीसाठी ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा !
केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !
राजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक
ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’
तरी ज्ञानेश महाराव या व्यक्तीवर हिंदू समाजाच्या देवदेवता व महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्याला तात्काळ अटक व्हावी व सदर इसमावर कठोर कारवाई व्हावी. तसेच संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करुन त्यांना सहआरोपी करण्यात यावे. या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटना यानी सांगली शहर पोलीस ठाण्याचे मा. संजय मोरे साहेब यांच्याकडे तक्रारी अर्ज देण्यात आला.
यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष मा आ. नितीनराजे शिंदे, श्री. लक्ष्मण नवलाई,मा.श्री अविनाश मोहिते,मा. श्री अजयकुमार वाले, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार मा.श्री. चंद्रकांत रा. बेलवलकर, सुभाष बाळासो गदडे, मा. श्री. मोहन विष्णू जाधव,मा. श्री. बाळासो पाटील, मनोज साळुंखे , सुहास कुलकर्णी, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.