फिफाने केले भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित

भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या वर्ल्डकप आयोजनाला बसणार धक्का

फिफाने केले भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्रयस्थांकडून फेडरेशनच्या कारभारात हस्तक्षेप होत असल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय फेडरेशनने ही कारवाई केली आहे.

या निलंबनाच्या कारवाईमुळे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होणारी १७ वर्षांखालील मुलींची वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर मे महिन्यात कारवाई केली होती आणि ती सदस्यीय समितीची स्थापना करून त्यांच्याकडे प्रशासनाचे काम सोपवले होते. शिवाय, गेले १८ महिने या संघटनेच्या निवडणुका रखडल्या आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करावी अशी सूचनाही न्यायालयाने केली होती.

त्यानंतर फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाने आशियाई संघटनेचे महासचिव विन्डसर जॉन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक भारतात पाठवले. भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या घटनेत जुलै महिन्यापर्यंत दुरुस्ती करावी अशी सूचना त्यांनी केली. शिवाय, १५ सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्यात अशी सूचनाही केली.

हे ही वाचा:

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

 

महिन्याभरापूर्वी न्यायालयाने या संघटनेच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात असे आदेश दिले होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या निवडणुका डिसेंबर २०२०मध्ये होणे अपेक्षित होते पण घटनेतील दुरुस्तीला विलंब होत असल्यामुळे निवडणुका रखडल्या.

फिफाने म्हटले आहे की, आम्ही भारतीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाशी संपर्कात असून आशा आहे की, काही सकारात्मक घडेल. फिफाच्या घटनेनुसार त्यांच्या सदस्य असलेल्या संघटनांमध्ये कायदेशीर आणि राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. याच कारणांमुळे यापूर्वीही इतर देशांच्या संघटनांवरही अशी निलंबनाची कारवाई करण्य़ात आलेली आहे.

 

Exit mobile version