दीर्घकाळापासून दहशतवादी कारवायांमुळे चर्चेत असलेल्या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. विस्थापनाच्या सुमारे तीन दशकांनंतर त्रिच्चल गावातील एका काश्मिरी पंडित महिलेने मुस्लिम समुदायातील नागरिकांसह परिसरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा केली. गावात पुन्हा हिंदू-मुस्लिमांमधील बंधूभाव वाढू दे, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मुस्लिम समुदायही मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनीही संपूर्ण काश्मीर विशेषतः आपल्या गावतही सुख शांती नांदण्यासाठी प्रार्थना केली.
‘आमचे हे गाव त्रिशूल या नावाने ओळखले जायचे, असे आम्ही ज्येष्ठांकडून ऐकले आहे. त्यानंतर त्याचे नाव त्रिच्चल ठेवले गेले. आम्ही काश्मिरी पंडितांच्या भूमीचे संरक्षण केले आहे. आताही आम्ही त्यांच्या आगमनाचे स्वागत करतो, जसे आम्ही ३० वर्षांपूर्वी करत होतो. सरकारने त्यांना त्यांची जागा द्यावी, असे आवाहन आम्ही करतो,’ असे स्थानिक गुलाम रसूल यांनी सांगितले. शिवलिंग स्थापन करणारी महिला डेजी रैना गावाच्या सरंपचही आहेत.
हे ही वाचा:
लाडली बहन योजना ठरली महिला सक्षमीकरणासाठी वरदान!
संसदेतील सुरक्षाभंगावरून विरोधी पक्षांचे राजकारण!
OLX वर जुना बेड विकायला गेला अन ६८ लाखांचा बसला फटका!
गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!
स्थानिकांचे श्रद्धास्थान
ज्या जागी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्या जागेला काश्मिरी पंडित आणि मुसलमान समाज पवित्र स्थान मानतात. काश्मिरी मुस्लिम या जागेला राजबल असेही संबोधतात, जेथे पीर बाई आणि सिकंदर साब रहा वास्तव्य करत असत. हे तिन्ही एकाच ठिकाणी राहात, जिथे तकिया नावाने ओळखले जायचे. त्यामुळे दोन्ही समुदायांचे हे ठिकाण श्रद्धास्थान आहे. हे शिवलिंग खास जयपूरहून काश्मिरी पंडित कुटुंबाने पाठवले आहे.