25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषतेलंगणात १ कोटी रुपयांची बक्षीस असलेली महिला नक्षली अटक!

तेलंगणात १ कोटी रुपयांची बक्षीस असलेली महिला नक्षली अटक!

अनेक मोठ्या घटनांमध्ये होता सहभाग

Google News Follow

Related

तेलंगणा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी (१६ ऑक्टोबर) पोलिसांनी एका नक्षलवादी महिलेला अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या नक्षलवादी महिलेवर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. सुजाता असे अटक करण्यात आलेल्या नक्षली महिलेचे नाव आहे.

अटक करण्यात आलेल्या नक्षली महिला सुजाताचा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभाग होता. अधिका-यांनी सांगितले की, महिला नक्षलवादी तेलंगणातील मेहबूबानगर येथे उपचारासाठी गेली असताना तिला अटक करण्यात आली. तेलंगाना पोलिसांचे हे मोठे यश आहे.

हे ही वाचा : 

विधानसभेसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!

अवैध दारू प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू!

विजेचा शॉक, नखे काढली, अन गोळ्यांनी छातीची चाळण केली!

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवाद संपवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. मंत्री अमित शाह यांनी म्हटल्यानुसार, लगतच्या मागील महिन्यांमध्ये अनेक नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तसेच अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून नव्या जीवनाला सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी छत्तीसगढच्या नारायणपुर-दंतेवाड़ा सीमाभागाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा