‘सातव्या डावातील पराभवानंतर ही स्पर्धा जिंकू शकतो, असे मला वाटत होते. या पराभवानंतर मी नक्कीच निराश झालो होतो. मात्र त्या सामन्यातील खेळ खूप समाधान देत होता. त्या पराभवाने मला जणू सर्वोत्तम खेळासाठी प्रेरित केले. त्या सामन्यानंतर माझा खेळ खूपच चांगला होण्यास सुरुवात झाली,’ असे गुकेशने सांगितले. गुकेशने ऍलिकसी फिरोझाला पराभूत करून टोरंटो येथील कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली असून तो ही स्पर्धा जिंकणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
ही स्पर्धा जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने या सर्वांत महत्त्वाच्या क्षणाबद्दल सांगितले. ‘सातव्या गेममधील पराभवानंतर मला खरोखर वाटले की, जर मी योग्य ते करत राहिलो आणि माझी मानसिक स्थिती योग्य असेल तर मी खरोखरच विजय मिळवू शकेन,’ असे गुकेश म्हणाला.सर्वांत कमी वयाचा जागतिक चॅम्पियन ठरण्याच्या, त्याने लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाच्या तो अगदी समीप पोहोचला आहे, याबाबत त्याला विचारले असता, ‘विजेता झाल्यामुळे खूप खूष आहे.
मी सर्वांत लहान आहे का, याचा विचारही करत नाही. जगज्जेतेपद हेच आपले अंतिम लक्ष्य आहे. जागतिक लढतीत सर्वोत्तम कामगिरी हे आता माझे लक्ष्य आहे. या लढतीची सर्वोत्तम पूर्वतयारी मी करणार आहे. अर्थात त्यापूर्वी पुरेशी विश्रांती घेणार आहे. गेले तीन आठवडे खूप तणावाचे होते,’ असे गुकेशने सांगितले.‘विश्रांतीनंतर मी जागतिक चॅम्पियनशिपचा विचार करेन. माझ्या टीमसोबत चर्चा करून त्याचे नियोजन करेन,’ असेही त्याने सांगितले.
ही वाचा:
ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश
‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर एमडीएच, एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी होणार
विश्वनाथन आनंद यांच्या मिळणाऱ्या सहकार्याबद्दलही त्याने आवर्जून सांगितले. ‘माझ्या कारकिर्दीत आनंद सरांचा नेहमीच मोठा आधार राहिला आहे. ते केवळ माझे प्रेरणास्थान आणि आदर्शच नाही तर मला शक्य तितक्या सर्व प्रकारे त्यांनी पाठिंबाही दिला आहे,’ असे गुकेश म्हणाला.‘भारतात बुद्धिबळ वेगाने प्रगती करत आहे. देशातील खेळासाठी हा उत्तम काळ आहे. आम्ही सर्व चांगले काम करत आहोत आणि जिंकणे ही खरोखरच मोठी कामगिरी आहे. मला आशा आहे की यामुळे अधिकाधिक जण हा खेळ खेळण्यासाठी पुढे येतील,’ असा विश्वास गुकेशने व्यक्त केला.
टोरंटोमध्ये नवोदित खेळाडू म्हणून त्याला मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही गुकेशने आवर्जून सांगितले. ‘येथील सर्वजण मला पाठिंबा देत आहेत आणि बुद्धिबळासाठी उत्साही आहेत, हे पाहून खूप आनंद झाला. मी सहसा स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी फारसा संवाद साधण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु खेळादरम्यान आणि नंतर जेव्हाही त्यांनी आनंद व्यक्त केला तेव्हा ते पाहून खूप आनंद झाला. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.