संपूर्ण जग सध्या कोविडचा सामना करत आहे. कोविडच्या विविध उत्परिवर्तनांमुळे देखील संपूर्ण जगासमोर गहन प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर लसीकरण हा हुकूमी उपाय असल्याचे समोर आल्याने जगातील विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ज्या लोकांची प्रतिकारक्षमता कमी झाली आहे, अशा लोकांसाठी कोविड-१९ वरील फायझर आणि मॉडर्ना लसीला मान्यता दिली आहे. या दोन्ही लसींच्या बूस्टर डोसला अमेरिकेच्या एफडीएने मान्यता दिली आहे.
हे ही वाचा:
या जिल्ह्यात ठाकरे सरकारने गुन्हेगारी वाढवली?
…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा
ट्विटरनंतर इन्स्टाग्रामचीही राहुल गांधींवर कारवाई
एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?
यापूर्वी जर्मन आणि इस्रायलने या लसींना मान्यता दिली आहे, अथवा मान्यता देण्याच्या विचारात आहेत. कोविडच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका संपूर्ण जगाला सध्या भेडसावू लागला आहे, त्यामुळे या लसींचे महत्त्व वाढले आहे.
फायझरने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीने बायोनटेकसोबत तयार केलेल्या लसीची परिणामकारकता कमी होत जाते. एका अभ्यासातून समोर आलेला निष्कर्षानुसार या लसीच्या दुसऱ्या मात्रेनंतर चार महिन्यांनी या लसीची क्षमता ९६ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत कमी होते.
मॉडर्नाने देखील त्यांच्या लसीला एका बूस्टर मात्रेची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. डेल्टा उत्परिवर्तन संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा घडवून आणू शकत असल्याने या दोन्ही कंपन्यांमार्फत उघड करण्यात आलेल्या या बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.