निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !

हरदीपसिंग निज्जरलाही दिली होती चेतावणी

निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !

जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा कॅनडामध्ये मृत्यू झाल्यानंतर एफबीआयने अमेरिकेतील खलिस्तानी यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची चेतावणी दिली असल्याचे एका अहवालात दिसून आले आहे.खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद सुरूच आहे.

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) च्या एजंट्सनी अमेरिकेतील खलिस्तानी यांनी भेट दिली होती आणि तुमच्या जीवाला धोका असल्याची चेतावणीही दिली असल्याचे इंटरसेप्टद्वारे माहिती मिळाली आहे.

खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख हरदीपसिंग निज्जर यांची १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनगोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादाला तोंड फुटले.त्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताचा संबंध असल्याचे वक्तव्य केले होते.भारताने देखील कॅनडाने केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि हास्यास्पद असल्याचे सांगत फेटाळून लावले होते.

अमेरिकन शीख कॉकस कमिटीचे समन्वयक प्रितपाल सिंग यांनी द इंटरसेप्टला सांगितले की, निज्जर मारल्यानंतर माज्यासह कॅलिफोर्नियातील इतर दोन शिखांना अमेरिकेच्या एफबीआयकडून फोन आले होते, तसेच भेटही झाली होती.जूनच्या दरम्यान दोन एफबीआय विशेष एजंट्सनी मला भेट दिली होती आणि त्यांनी मला सांगितले माझ्या जीवाला धोका आहे.धमकी कुठून येत आहे हे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले नाही, परंतु त्यांनी सांगितले की मी सावधगिरी बाळगली पाहिजे,ते पुढे म्हणाले.इतर दोन अमेरिकन शीख आहेत त्यांनी स्वतःचे नाव सांगण्यात नकार दिला,मात्र एफबीआय एजंट्सला भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत फेडरल एजन्सीने कोणतेही भाष्य केलेलं नाही.

हे ही वाचा:

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

तसेच कॅनडाच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी खलिस्तानी घटकांना चेतावणी दिली होती की,निज्जर मारला जाण्यापूर्वी तुमच्या जीवाला धोका आहे असे, ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा परिषदेचे प्रवक्ते मोनिंदर सिंग यांनी सांगितले.”त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला हत्येचा धोका आहे, परंतु त्यांनी कधीही हे स्पष्टपणे सांगितले नाही की, हा धोका भारतीय गुप्तचरांकडून होता की, अन्य इतर संघटनांकडून होता, याची संपूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली नाही, मोनिंदर सिंग पुढे म्हणाले.मोनिंदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या एजंटांनी निज्जरला त्याच्या जीवाला धोका असल्याची चेतावणी दिली होती.

यासंदर्भात माहिती देताना कॅलिफोर्नियास्थित एनजीओ एनसाफचे सह-संचालक सुखमन धामी यांनी द इंटरसेप्टला सांगितले की, शीख समुदायाच्या नेत्यांच्या जीवाला धोका असल्याने ते लक्ष्य ठरू शकतात, याची माहिती आम्हाला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान शनिवारी, एनआयएने चंदीगड आणि अमृतसरमधील शीख फॉर जस्टिस (SFJ) चे यूएसस्थित प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या दोन मालमत्ता आणि ४५ कनाल शेतजमीन जप्त केली आहे.

Exit mobile version