फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

हिंदूंनो सावध व्हा, भाजप आमदार अतुल भातखळकरांचे आवाहन 

फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी मशिदीतून फतवे निघाल्याच्या बातम्या अनेक समोर आल्या होत्या. याच दरम्यान, ‘व्होट जिहाद’ नावाची संकल्पना देखील समोर आली होती. अशा गोष्टींमुळे लोकसभेत इंडी आघाडीला आणि राज्यात मविआला पुरेपूर फायदा झाला. राज्याच्या विधानसभेच्या तोंडावर याच गोष्टींची पुन्हा पुनरावृत्ती होत असल्याचे समोर येत आहे. याबाबत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये हिंदू साधू-संतांची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करण्याचे आवाहन एक मौलवी करत असताना दिसत आहे. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी हिंदूंना सावध होण्याचे आवाहन केले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमधील मौलवी मुसलमानांना आवाहन करत म्हणतो, जो कोणी शिंदे-फडणवीस-अजित पवार आणि महायुतीसोबत आहे, ही महायुती संतांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे, त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे जे मुसलमान महायुती सोबत आहे, ते यांचे वफादार आहेत, ते इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्याशी प्रामाणिक नाहीयेत. शिंदे सरकारसोबत जे मुसलमान उभे आहेत, आम्ही त्यांचा निषेध करतो, असा मौलवी व्हिडीओमध्ये बोलत आहे.

हे ही वाचा : 

२४ कॅरेटची लक्षणे…

जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले आप नेते १८ महिन्यानंतर तुरुंगातून येणार बाहेर

उद्धव ठाकरेंची परिस्थिती शोलेसारख्या जेलरसारखी!

यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी सर्व हिंदूंना सावध होण्याचे आवाहन केले आहे. वोट जिहादची अजान झाली आहे, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. लोकसभेतही भाजपच्या विरोधात असेच फतवे समोर आले होते. भाजप विरोधात मतदान करण्याचे अनेक मशिदीतून आवाहन करण्यात आले होते. लोकसभेनंतर ‘व्होट जिहाद’ संकल्पनाही समोर आली होती. व्होट जिहाद नुसार, मुस्लीम मतदारांचा एक गठ्ठा एखाद्या पक्षाला मतदान करतो. यावरून महायुतीच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेत विरोधकांवर टीका केली आणि इंडी आघाडीला याचा फायदा झाल्याचा आरोप केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबबत ट्वीटकरत अनेक मतदार संघातील आकडेवारीची यादी देखील समोर आणली होती, ज्यामधून मुस्लिमांचे एक गठ्ठा मतदान विरोधी पक्षाला झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

Exit mobile version