२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला.प्रभू राम मंदिर ट्रस्टीकडून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते.या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी हे देखील उपस्थित होते.परंतु, डॉ. इमाम उमेर अहमद यांच्या उपस्थितीवर कट्टरपंथीयांनी विरोध दर्शवत त्यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.
तसेच फोनवरुन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे.मात्र, डॉ.इमामांनी कट्टरपंथीयांचा फतवा धुडकावत म्हणाले, “मी फतवा मानत नाही, काहीही झालं तरीही मी माफी मागणार नाही. ज्यांना अडचण असेल त्यांनी भारत सोडून खुशाल पाकिस्तानात जावं.” असे डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले आहेत.एएनआय या वृत्तसंस्थेला डॉ इमाम उमेर अहमद इलियासी यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
डॉ इमाम म्हणाले की, माझ्या हातात जो फतवा आहे तो माझ्या विरोधात आहे. मला रामजन्मभूमी ट्रस्टकडून प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होत. मी त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. मी दोन दिवस विचार केला आणि ठरवलं की आपण या सोहळ्याला गेलं पाहिजे. आपल्या देश हिताच्या दृष्टीने हे सौहार्दाचं वातावरण होईल. हा विचार करुनच मी कार्यक्रमाला गेलो होतो. मला माहीत होतं की ,विरोध होईल.परंतु, इतका विरोध होईल याची कल्पना नव्हती” असे डॉ. इमाम म्हणाले.
हे ही वाचा:
राबडीदेवीच्या गोशाळेतील कामगाराला लाच म्हणून मिळाली मालमत्ता
‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’
हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!
#WATCH | Delhi | Fatwa issued against Chief Imam of All India Imam Organization, Dr Imam Umer Ahmed Ilyasi after he attended the Pranpratishtha ceremony of Ram Lalla at Ram Temple in Ayodhya.
He says, "As a chief Imam, I received the invitation from Shri Ram Janmbhoomi Teerth… pic.twitter.com/iVe2bA3s1X
— ANI (@ANI) January 29, 2024
ते पुढे म्हणाले की, मी सोहळ्यासाठी अयोध्येत पोहचलो.अयोध्येत गेल्यानंतर माझं स्वागत करण्यात आलं व साधू संतांनीही मला आदर दिला.मी तेथूनच एक संदेश दिला.मी म्हणालो, आपल्या जाती, पंथ, धर्म, पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील. पण सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे.आपण सगळे भारतात राहतो, आपण सगळे भारतीय आहोत. आपण सर्वजण मिळून भारताला मजबूत बनवूया.आमच्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्र आहे.हे भाष्य मी केलं होत.यावरूनच मला फतवा देण्यात आला आहे.माझ्या फोनवर मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत.आम्हा सर्वांना शिव्या दिल्या जात आहेत.माझाकडून माफीची मागणी करण्यात अली आहे तसेच मला जीवे मारण्याची धमकीचेही फोन आले आहेत, असे डॉ.इमाम यांनी सांगितले.
डॉ.इमाम यांनी फतवा जारी करणाऱ्यांना ठणकावले आणि पाकिस्तानात निघून जाण्यास सांगितले.ते म्हणाले की, मी फतवा मानणार आणि कोणाची माफीही मागणार नाही.तसेच राजीनामा सुद्धा देणार नाही.मी कोणताही अपराध केलेला नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे.माझ्या वक्तव्यामुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात निघून जावं, असे डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी यांनी म्हटले आहे.