दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कळघमचे अध्यक्ष विजय एका नवीन वादात अडकल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (१६ एप्रिल) अखिल भारतीय मुस्लिम जमातने अभिनेत्याविरुद्ध फतवा जारी केला आणि मुस्लिमांना त्याच्यासोबत उभे राहू नये असे आवाहन केले आहे. एआयएमजेचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले की, विजयने मुस्लिमांची प्रतिमा मलिन केली आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे.
मौलानांच्या म्हणण्यानुसार, विजयने त्याच्या इफ्तार पार्टीत जुगारी आणि मद्यपींना आमंत्रित केले होते. यामुळे मुस्लिमांची प्रतिमा मलिन झाली. या कारणास्तव त्याच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला. रिझवी म्हणाले, “त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे आणि मुस्लिमांशी सौहार्दपूर्ण संबंध राखले आहेत. तथापि, त्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये मुस्लिमांना दहशतवादी म्हणून नकारात्मक पद्धतीने चित्रित केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “जुगारी आणि मद्यपींना त्याच्या इफ्तार पार्टीत आमंत्रित करण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे, तामिळनाडूतील सुन्नी मुस्लिम त्याच्यावर नाराज आहेत. यानंतर त्यांनी फतवा मागितला. म्हणून, मी माझ्या प्रतिसादात एक फतवा जारी केला आहे की मुस्लिमांनी विजयच्या बाजूने उभे राहू नये असे आवाहन केले.
हे ही वाचा :
ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल करणारा भारतीय विद्यार्थी चिन्मय देवरे आहे कोण?
“दंगलीचे आवाहन मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून करण्यात आले होते”
एसआयटी करणार मुर्शीदाबाद दंगलीची चौकशी
संसदेत मंजूर झालेला कायदा राज्यात लागू न करण्याचा अधिकार ममतांना कोणी दिला?
दरम्यान, तमिळगा वेत्री कळघम पक्षाने केंद्राकडून अभिनेत्यासाठी वाय-सुरक्षा मागितली होती. कारण “मुस्लिमांकडून धोका” असल्याची त्यांना भीती होती. व्हीसीकेचे प्रवक्ते वन्नियारासू म्हणाले, “विजयने त्याच्या ‘काठी’ आणि ‘बीस्ट’ चित्रपटांमध्ये मुस्लिमांना वाईट पद्धतीने दाखवले आहे. म्हणूनच, विजय आणि टीव्हीकेला वाटले की अभिनेत्याला मुस्लिमांकडून धोका असू शकतो आणि त्यामुळे गृह मंत्रालयाकडून संरक्षण मागितले होते.