हरियाणातील करनाल जिल्ह्यातून अनेक तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात गेले आहेत. मात्र यापैकी काही जण डंकीसारखे भारतातून गेले आहेत. मात्र तिथे अशा दुर्घटना घडत आहेत, की लोकांचे मृत्यू होत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. नरुखेडी गावातील संजय हा तरुण अमेरिकेला गेला होता. मात्र त्याचा तिथे मृत्यू झाला. मृत्यूच्या १६ दिवसांनंतर त्याचे शव घरी आले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा अमेरिकेत मृत्यू झाला होता. पित्याला त्याच्या मुलाचा मृतदेह कर्ज काढून भारतात मागवावा लागला. संजयचे आई-वडील, पत्नी आणि मुले शेवटच्या क्षणी त्याला बघू इच्छित होते.
संजयवर अंत्यसंस्कार गावीच व्हावे, अशी नातेवाइकांची इच्छा होती. गावातील स्मशानभूमीतच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. संजय ऑगस्ट २०२२मध्ये अमेरिकेला गेला होता. डंकीच्या मार्गे तिथे पोहोचायला त्याला आठ ते नऊ महिने लागले होते. अमेरिका पोहोचल्यानंतर त्याला तिथे काम मिळाले होते आणि तो तिथे एका दुकानात काम करत होता. त्याच्यावरील कर्जही उतरेल आणि त्याच्या घरच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्याला होती. मात्र तत्पूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
काशी विश्वनाथ मंदिरासह नागर शैलीत साकारले आहे ज्ञानवापी!
दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!
नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!
जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…
त्याची तब्येत सुधारली होती. मात्र त्यानंतर तो पुन्हा आजारी पडू लागला होता. या दरम्यान १० जानेवारीला पुन्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याने आई, पत्नी आणि मुलांशी फोनवरून संवाद साधला होता. तसेच, तो लवकरच बरा होईल, असे त्याने सांगितले होते. मात्र त्यानंतर सहा तासांतच त्याचा मृत्यू झाला. संजयला १२ वर्षांचा एक आणि नऊ वर्षांचा एक अशी दोन मुले आहेत.