आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांच्या चाचणीचे भवितव्य अधांतरी

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी मुदतवाढ हवी

आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांच्या चाचणीचे भवितव्य अधांतरी

कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने अद्याप आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत. मंगळवारी ही हंगामी समितीने यावर चर्चा केली पण ते तारीख नक्की करू शकलेले नाहीत. त्यांना आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडे संघ पाठवण्यासाठी मुदतवाढ भारताकडून करण्यात आली आहे, पण त्यांनी ती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे निवड चाचणीचे घोडे अडकले आहे.

भारताच्या कुस्तीगीरांची यादी १५ जुलै पर्यंत द्यायची आहे पण हंगामी समितीने १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. मात्र ओसीएने ती मुदतवाढ अद्याप दिलेली नाही. कुस्तीगीरांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा असा हंगामी समितीचा हेतू आहे.

बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह सहा खेळाडू या चाचणीसाठी तयार आहेत पण त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय. ही बाब हंगामी समितीने ओसीएला कळवली आहे. पण त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही.

बृजभूषण यांच्याविरोधातील ३८ दिवसांच्या आंदोलनामुळे आपल्याला कुस्तीची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून आम्हाला थोडा वेळ मिळावा अशी कुस्तीगीरांची अपेक्षा आहे. हंगामी समितीने या खेळाडूंना सवलत देताना केवळ चाचणीसाठी एका लढतीला सामोरे जाण्याची मुभा दिली होती, पण त्यावर प्रचंड टीका झाली, विरोधाचा सूर उमटला.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली

एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही

आणखी एक दोन दिवस थांबा कदाचित ओसीएकडून बातमी येईल असे हंगामी समितीचे बाजवा म्हणाले आहेत. या समितीत समाविष्ट करण्यात आलेले प्रशिक्षक ग्यान सिंग यांनीही आशा व्यक्त केली आहे की लवकरच मुदतवाढ मिळेल.
या हंगामी समिती मध्ये सगळे काही आलबेल आहे असे नाही. कारण बाजवा हेच सगळे निर्णय घेत आहेत असे सिंग यांचे म्हणणे आहे. बाजवा आमच्याशी नीट बोलत नाहीत, असेही सिंग म्हणतात. आपण यावर कधी चर्चा करणार असे विचारल्यावर ते म्हणतात की आपण भेटू पण त्या पलीकडे काही होत नाही. सिंग म्हणाले की त्यांनी तर या समितीतून राजीनामा देण्याचाही विचार केला होता पण खेळाडूंच्या हितासाठी तो विचार सोडून दिला.

Exit mobile version