बीडमध्ये एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे. या अपघातात मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २ जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालगाडीच्या धडकेने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना बीडच्या परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात घडली. मुंजा ढोणे असे मृत मेंढपाळांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मुंजा ढोणे आणि मधुकर सरवदे या दोन मेंढपाळांनी आज आपल्या मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या. यावेळी रेल्वे पटरीवरू मेंढ्या जात होत्या. यावेळी परळी-हैद्राबाद रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापूर शिवारानजीक अचानक समोरून मालगाडी आली.
अचानक मालगाडी समोरून आल्याने दोन्ही मेंढपाळ बिथरले. दोन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे बचावासाठी वेळचं मिळाला नाही. क्षणार्धात मालगाडीने २२ मेंढ्या आणि दोन जनावरांना जाग्याला चिरडले. मेंढपाळ मुंजा ढोणे याचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला. मधुकर सरवदे हा मात्र सुदैवाने यातून बचावला. दरम्यान, या घटनेत मेंढपाळ आणि मेंढयांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा..
मध्य प्रदेशातील गुना येथे विमान अपघात, दोन पायलट जखमी !
बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा
उपराष्ट्रपतींकडून काँग्रेस नेत्याला चपराक