आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

मुंबईतील आरे भागात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे. शुक्रवार सायंकाळी बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. याआधी दिवाळीच्या दिवशी दीड वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. महिन्याभरात दोन वेळा बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बिबट्याने महिलेवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेचे नाव संगीता गुरव असून, त्या आदर्श नगर परिसरातील रहिवाशी आहेत. सायंकाळी संगीता गुरव घरी जातं होत्या. तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संगीता गुरव यांच्या डोक्याला जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर जोगेश्वरीत ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार केले जातं आहेत.

गेल्या वीस दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबरला बिबट्याने दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला होता. दिवाळीच्या दिवशी मुलगी आइसोबत दिवे लावण्यासाठी घराबाहेर आली होती. दिवे लावल्यानंतर घरात जातं असताना बिबट्याने मुलीवर हल्ला केला. हल्ल्यावेळी मुलगी एकटी होती. मुलगी बराच वेळ घरात आली नाही म्हणून शोध घेतला असता चिमुकलीचा मृतदेह जंगलात आढळला होता.

हे ही वाचा:

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

दरम्यान, या परिसरात कॅमेरा ट्रक केले आहेत. शिवाय स्थानिक रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन ही केले आहे. अचानक बिबट्या दिसल्यावर त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलही त्यांना समजावून सांगितले आहे, अशी माहिती आहे.

Exit mobile version