काँग्रेसमधून बाहेर पडत द डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी हा पक्ष स्थापन करणारे गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांच्याबाबतीत धक्कादायक खुलासा केला आहे.
फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे लपूनछपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असत असा दावा आझाद यांनी केला असून ही भेट रात्री होत असे, जेणेकरून दिवसा लोकांच्या नजरेत ते येऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणतात की, अब्दुल्ला हे श्रीनगरला एक, जम्मूला दुसरे आणि दिल्लीत तिसरेच काहीतरी बोलत असतात. आझाद यांनी अब्दुल्लांची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचाच दावा या विधानातून केला आहे.
आझाद म्हणाले की, २०१४मध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती करण्यासाठी अब्दुल्ला यांनी प्रयत्न केले होते. हे दोघे पितापुत्र दुटप्पी राजकारण खेळत होते. भविष्यात आपण भाजपाशी युती करू असे संकेत अब्दुल्ला यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिल्याचेही आझाद यांनी सांगितले. इंडिया टुडेला जे अब्दुल्ला यांनी सांगितले ते चुकून सांगितले नव्हते तर फारुख आणि त्यांचा पुत्र ओमर हे सरकार आणि विरोधी पक्ष असे दोघांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असत.
आझाद म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.
हे ही वाचा:
६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!
अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई
नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर
३७ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ठरला निर्दोष!
आझाद म्हणाले की, ३ ऑगस्ट २०१९मध्ये ३७० कलम रद्द करण्याआधी अब्दुल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. हा निर्णय घेण्यासाठी अब्दुल्ला यांना मोदींनी विश्वासात घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. शिवाय, काश्मीर खोऱ्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याची सूचनाही अब्दुल्ला यांनीच केली होती.
आझाद म्हणाले की, पीडीपीचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांनी २०१४मध्ये भाजपाशी युती करण्याचे प्रयत्न केले तेव्हा मी त्यांना सल्ला दिला होता की, भाजपाशी युती करू नका. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी हा निर्णय़ घेतल्याची खंत त्यांनी पुढे व्यक्त केली होती.