25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषफारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!

फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!

फारुख यांच्या वक्तव्याने राष्ट्रीय राजकारणात खळबळ

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे इंडी आघाडीचे भागीदार एक एक करून बाहेर पडत आहेत.जम्मू-काश्मीरमध्येही इंडी आघाडीत मोठी फूट पडली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआयच्या बातमीनुसार, पत्रकारांनी फारुख अब्दुल्ला यांना इंडी आघाडीमधील जागावाटपावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जोपर्यंत जागावाटपाचा प्रश्न आहे, मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर निवडणूक लढवेल, यात काही शंका नाही.विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.फारुख यांच्या वक्तव्याने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका

इम्रान खानच्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर

भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!

शेतकऱ्यांकडून राजकीय विधाने योग्य नाहीत

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी बाजू बदलल्यानंतर इंडी आघाडीच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.जेडीयूनंतर आरएलडीनेही इंडी आघाडीची साथ सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीमध्ये प्रवेश केला.दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी देखील एकला चलोचा नारा दिला.तसेच आम आदमी पार्टी देखील जागावाटपाच्या मुद्यावर कठोर भूमिका घेत आहे.

दरम्यान, फारूर यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. एकीकडे एनडीएला आव्हान देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत.तर दुसरीकडे इंडी आघाडीतच मतभेत असल्याचे दिसून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा