फारुख अब्दुल्लांना उशीरा सुचले शहाणपण; पाकिस्तानला सुनावले!

भारताची मैत्री करायची असेल तर दहशतवाद थांबवा

फारुख अब्दुल्लांना उशीरा सुचले शहाणपण; पाकिस्तानला सुनावले!

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ.फारूख अब्दुल्ला यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ‘काश्मीर कधीच पाकिस्तान होणार नाही’, असे डॉ फारूख अब्दुल्ला म्हणाले आहेत. बाहेरच्या कामगारांचा उल्लेख करून ते म्हणाले की, अनेक बाहेरचे कामगार काश्मीरमध्ये कमावायला येतात आणि दोन पैसे कुटुंबीयांना पाठवतात, त्यांना काल या क्रूरलोकांनी शहीद केले.

डॉ फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले, यामध्ये आमच्या एका डॉक्टरचाही समावेश होता, जे लोकांची सेवा करायचे त्यांनाही या क्रूरलोकांनी ठार केले. हे करून या लोकांना मिळणार तरी काय?, असे करून हे पाकिस्तान बनेल असे त्यांना वाटते का?, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : 

उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध

सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार

आझमगडमध्ये सामूहिक धर्मांतराचा डाव हाणून पाडला

‘भाजपा ईव्हीएम सेट करत असेल तर मतदार यादीत घोटाळा कशाला करतील?’

आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय, ते लोक तिकडून (पाकिस्तान) येत आहेत आणि हे सर्व संपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, भारताशी संबंध सुधारायचे असतील तर हे सर्व थांबले पाहिजे. ‘काश्मीर कधीच पाकिस्तान होणार नाही, कधीही नाही’.

आम्हाला प्रगती करायची आहे. अजून कितीदिवस तुम्ही (पाकिस्तान) आम्हाला अडचणीत टाकणार आहात. काश्मीर पाकिस्तान होण्यासाठी १९४७ पासून सुरुवात केली गेली. ७५ वर्ष उलटूनही काश्मीर पाकिस्तान बनला नाही, तर आता कसा बनेल, असा सवालही डॉ फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. तुम्ही तुमच्या (पाकिस्तान) देशाकडे बघा आमच्याकडे बघू नका, आम्हाला पुढे जाऊ द्या, असे डॉ फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.

Exit mobile version