शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

पोलिसांनी मात्र दावा फेटाळला

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

पंजाब आणि हरियाणा सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका २२ वर्षांच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शुभकरन सिंग असे त्याचे नाव असून तो पंजाबच्या भटिंडा येथिल रहिवासी आहे. हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत सिंगचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे. मात्र सीमेवर कोणत्याही आंदोलकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

१३ फेब्रुवारी रोजी खनौरी सीमेवर शुभकरन सिंह इतर आंदोलकांमध्ये सामील झाले होते. त्या दिवशी शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीकडे मोर्चा नेण्यात आला होता. बुधवारी सकाळी शुभकरनने खनौरी आंदोलनस्थळी स्वत:साठी आणि इतर शेतकऱ्यांसाठी नाश्ता तयार केला. त्यांच्या सहकारी आंदोलकांनी सांगितले की, शुभकरनने त्यांना एकत्र बसून नाश्ता करण्यास सांगितले. त्याच्या पश्चात दोन बहिणी, एक आजी आणि त्याचे वडील चरणजीत सिंग असा परिवार आहे.

हेही वाचा..

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चे नेटफ्लिक्सवरील प्रदर्शन मुंबई हायकोर्टाने थांबवले!

पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!

आंध्र प्रदेशात सर्वाधिक ‘लखपती दीदी’

शुभकरन हा पशुपालन करत होता. त्याच्याकडे सुमारे तीन एकर जमीन आणि काही जनावरे आहेत. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुभकरन यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हरियाणाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात हरियाणाच्या जिंदच्या सीमेजवळ असलेल्या खनौरी येथे त्यांच्यावर लाठी आणि दगडफेक करण्यात आल्याने सुमारे १२ पोलिस जखमी झाले आहेत. यावर शेतकऱ्यांनी असा आरोप केला आहे कि हरियाणा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या शिवाय रबराच्या  गोळ्या सुद्धा झाडल्या.

Exit mobile version