शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरन सिंहच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची भरपाई!

तरुणाच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी, पंजाब सरकारची घोषणा

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरन सिंहच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची भरपाई!

पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर बुधवारी शेतकरी आंदोलनात उतरलेल्या शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला.शुभकरन सिंह असे शेतकरी तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर मृत्यू झालेल्या शुभकरन सिंह याच्या कुटुंबीयांना भगवंत मान सरकारने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.यासोबतच शुभकरन याच्या लहान बहिणीला पंजाब सरकार सरकारी नोकरी देखील देणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विटकरत याची माहिती दिली.भगवंत मान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शुभकरन सिंह यांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे आणि त्यांच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी दिली जाईल.दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल… माझे कर्तव्य पार पाडत आहे, असे ट्विट मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे.

हेही वाचा..

बाळासाहेबांची चिठ्ठी अन् मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार; काय लिहिलेलं चिठ्ठीत?

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

ठाकरेंच्या चार पिढ्या पाहिलेल्या मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द कशी होती?

कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

दरम्यान, खनौरी पंजाब आणि हरियाणा सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुभकरन सिंग या तरुणाचा मृत्यू झाला होता.शुभकरन सिंग हा पंजाबच्या भटिंडा येथिल रहिवासी आहे.हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत सिंगचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे. मात्र सीमेवर कोणत्याही आंदोलकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

Exit mobile version