बारवा दादासाहेब फाळके पुरस्कार सोमवार, २ मे रोजी जाहीर झाला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक चित्रपटांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर फरहान अख्तरला ‘तुफान’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल ट्विटरने हँडलने फरहान अख्तरचा एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती जाहीर केली आहे. ज्यामध्ये अभिनेता फिल्म फेस्टिव्हल ज्युरींचे आभार मानत आहे.
Farhan Akhtar @FarOutAkhtar won Best Actor for Toofaan in @dadasahebfest 12th Dada Saheb Phalke Film Festival-22https://t.co/aAig8PI0ds#dadsahebphalkefilmfestival @excelmovies @ROMPPictures #dadasahebphalke #miniboxoffice #filmfestival #filmmarket #filmmaking #filmmakers pic.twitter.com/DT9BuZ9dTS
— Dada Saheb Phalke Film Festival (@dadasahebfest) May 1, 2022
व्हिडिओमध्ये फरहान अख्तर म्हणाला, दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींनी मला तुफानमधील माझ्या अभिनयासाठी दिलेल्या या अतुलनीय सन्मानाबद्दल धन्यवाद. ‘तुफान’ हा एक खास चित्रपट आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा, लेखक, परेश रावल आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
फरहान अख्तरला तुफानसाठी १२ व्या दादासाहेब फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्याने स्ट्रीट बॉक्सरची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक, हुसैन दलाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान, राकेश आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
हे ही वाचा:
जर्मनीत घोषणा….मोदीजी भारताची शान!
राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल
व्लादिमीर पुतीन यांच्यावर होणार कर्करोगाची शस्त्रक्रिया
‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’
चित्रपट महोत्सवात ‘जय भीम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात रासकन्नूची भूमिका साकारणारा अभिनेता मणिकंदन याला चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.