भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?

गुरुवार, ५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारत देशासाठी एक आनंदी सकाळ घेऊन आला. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीही या संघाला फोने करून त्यांच्याशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. पण सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरने भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा देऊन ट्रोलिंगला आमंत्रण दिले आहे.

त्याचे झाले असे की फरहान अख्तर याने सकाळी अंदाजे पावणे अकराच्या सुमारास भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करण्यासाठी ट्विट टाकले. ‘तुम्ही जे फाईटींग स्पिरिट दाखवले आणि देशासाठी चौथ्यांदा मेडल पटकावलेत त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असे फरहानने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले होते. पण हे करताना त्याने घोळ असा घातला की त्याने आपल्या ट्विटची सुरूवातच ‘गो गर्ल्स’ असे म्हणून केली. अर्थात त्याचा असा समज होता की भारतासाठी पदक हे महिला संघाने पटकावले आहे.

हे ही वाचा:

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक

महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु

राज्याच्या खजिन्यात जमा झाला इतका जीएसटी

हे सरकार नेमके कोणाचे?

भारतीय पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना खेळत आहेत. पण आज ५ ऑगस्ट रोजी पुरुषांचा सामना पार पडला असून महिलांचा सामना उद्या म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पण या कशाचीच माहिती न घेता फरहान अख्तरने अभिनंदनाचे ट्विट टाकले आणि त्याला मुलींचा सामना करावा लागला. चूक लक्षात आल्यावर फरहानने हे ट्विट डिलिट केले. पण तोपर्यंत त्याच्या या ट्विटचे स्क्रिनशॉट काढून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

एखाद्या गोष्टीची माहिती न घेता त्यावर भाष्य करण्याची फरहानची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जेव्हा देशभरात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू होते. तेव्हा देखील फरहान मुंबई येथील आंदोलनात मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी सहभागी झाला होता. पण त्यावेळी देखील त्याला सीएए काय आहे हेच माहिती नव्हते.

Exit mobile version