सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

भारताचे सर्वोच्च सेनाधिकारी सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांच्यावर राष्ट्रीय राजधानीच्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत पूर्ण लष्करी सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक राजकीय नेते आणि लष्करी अधिकार्‍यांनीसुद्धा श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या नियमानुसार जनरल रावत यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासोबत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी अंत्यसंस्कार केले. ज्येष्ठ कन्या कृतिकाने मुखाग्नी दिला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत पोहोचून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी, विविध देशांचे संरक्षण संलग्नता, भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन आणि ब्रिटिश उच्चायुक्त ऍलेक्स एलिस यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा:

अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

५७व्या वर्षी बोरिस जॉन्सन यांच्याकडे हलला सातव्यांदा पाळणा

३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक स्थगितच

ममतांचे हे आदेश राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक

भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला आदरांजली वाहण्यासाठी तिन्ही सेवेतील लष्करी जवानांनी रस्त्याकडे कूच केले. जनरल रावत यांचे पार्थिव, तिरंग्यात गुंडाळलेल्या शवपेटीत आणून, फुलांनी सजवलेल्या बंदुकीच्या गाडीत नेले. तेंव्हा लोकांनी त्यांच्या सन्मानासाठी फुलांचा वर्षाव केला आणि घोषणाबाजी केली.

Exit mobile version