विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने

विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने

श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून शुक्रवार ४ मार्च पासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. भारताच्या दृष्टीने हा कसोटी सामना खास असणार आहे. कारण भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा हा शंभरावा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने बीसीसीआयकडून एक विशेष निर्णय घेण्यात आला असून हा सामना प्रेक्षकांच्या साक्षीने होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विराट कोहली हा भारताचा स्टार खेळाडू असून जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतभर असलेले विराट कोहलीचे चाहते लक्षात घेता आपल्या या लाडक्या खेळाडूचा शंभरावा सामना प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून बघण्यासाठी हे नक्कीच प्रेक्षक उत्सुक आहेत. पण कोविड प्रतिबंधक नियमावली लक्षात घेता, सध्या भारतीय संघाचे सामने बघण्यास प्रेक्षकांना परवानगी देण्यात येत नाहीये.

पण असे असले तरीदेखील विराट कोहलीचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीतच पार पडावा असे क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला देखील वाटत आहे. पंजाब मधील मोहाली येथे हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देता येईल का? यासाठी क्रिकेट नियामक मंडळाने पंजाब क्रिकेट संघटनेशी चर्चा केली. या चर्चेत पंजाब क्रिकेट संघटनेतर्फे हे निश्चित करण्यात आले की या सामन्याला प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे विराट कोहलीचा शंभरावा सामना हा प्रेक्षकांच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना

आयएनएस विशाखापट्टणम पीएफआरमध्ये प्रथमच सहभागी

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

हा सामना जिंकून विराट कोहलीला विजयी भेट देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत श्रीलंकेला ३-० अशी धूळ चारल्यानंतर कसोटी मालिकेवरही आपला शिक्का उमटवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.

Exit mobile version