नेटफ्लिक्सवरील ‘द बिग बँग थिअरी’ हा अमेरिकन कॉमेडी शो ओटीटी खूप लोकप्रिय झालेला आहे. ‘द बिग बँग थिअरी’ मधील एका कार्यक्रमांमुळे या शो समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
माधुरी दीक्षितबाबत आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याबद्दल नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवली आहे. राजकीय विश्लेषक मिथून विजय कुमार या व्यक्तीने ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून हा शो काढून टाकण्याची मागणी केली आहे.
शोमध्ये माधुरी दीक्षितवर ज्याप्रकारे कमेंट करण्यात आली आहे ते अतिशय अपमानास्पद असल्याचे मिथुन विजय कुमार याचे म्हणणे आहे. त्याने शोच्या कंटेंटवर लैंगिकता आणि महिलांबद्दल द्वेषाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला आहे. या शोच्या एका भागामध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात तुलना देखील करण्यात आली आहे.
बिग बँग थिअरी शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये, जिम पार्सन्स शेल्डन कूपरची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात या भागात ‘राज कूथरापल्ली’ ची भूमिका करणारा कुणाल नय्यर आणि जिम पार्सन्स टीव्हीवर ‘कहो ना प्यार है’ चित्रपट पाहत असतात. अमिषा पटेलला पाहून ‘शेल्डन’ ‘ही स्त्री ऐश्वर्या राय आहे का?’ असा प्रश्न विचारते. त्याला उत्तर देताना राज ‘हो. ती किती छान अभिनेत्री आहे!’ असे म्हणतो. शेल्डनला ते पटत नाही ती म्हणते , ‘मला ती गरीबांची माधुरी दीक्षित आहे असे वाटते. शेल्डनच्या बोलण्यावर राजला राग येतो. या एपिसोडमध्ये तो ऐश्वर्या रायला ‘देवी’ आणि माधुरी दीक्षितला तिच्या तुलनेत ‘कुष्ठरोगी वेश्या’ म्हणतो. नेमक्या याच दृश्यावरून मिथुन विजय कुमारने संतापून नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मिथुन विजय कुमारने नाराजी व्यक्त करत हा भाग लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी केली आहे. आपण माधुरी दीक्षित चे चाहते असल्याचे सांगत मिथुन विजय कुमारने नेटफ्लिक्सच्या मुंबई कार्यालयाला ही नोटीस पाठवली आहे.’द बिग बँग थिअरी’ मध्ये अपमानास्पद शब्द वापरल्याने मी खूप दुखावलो आहे. हा शब्द अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या संदर्भात वापरण्यात आला होता आणि तो केवळ अपमानास्पद नव्हता तर खूप दुखावणारा असल्याचे त्याने म्हटले आहे.
नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांना त्यांच्या कामासाठी जबाबदार असणे आवश्यक आहे. ते ज्या समुदायांची सेवा करत आहेत त्यांच्या सांस्कृतिक मूल्ये आणि भावनांबद्दल संवेदनशील असणे आवश्यक आहे. स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या सामग्रीकडे लक्ष देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे मिथुन विजय कुमार यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे .
हे ही वाचा:
नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना
बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
अन्यथा कडक कारवाई करणार
एपिसोडच्या या सीनचा संदर्भ देताना मिथुन विजय कुमार म्हणाले की, या प्रकारचा मजकूर महिलांबद्दल द्वेषाला चालना देणारा आहे आणि तो कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही जर त्यांना या प्रकरणी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा नोटीसमध्ये केलेल्या मागण्यांचे पालन केले नाही तर नेटफ्लिक्सवर आणखी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.