चक्क साधूने बनवला सोलर फॅन

या साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

चक्क साधूने बनवला सोलर फॅन

कोणाचे डोके कुठे चालेल काही सांगता येत नाही. आता या साधुने चक्क सोलर फॅन बनवला आहे. या व्हिडिओमध्ये साधू डोक्यावर पंखा घेऊन चालताना दिसत आहे. त्याच्या पंखाची दिशा त्याच्या चेहऱ्याकडे आहे, तर मागच्या बाजूला सोलर पॅन बसवलेला आहे. त्यामुळे पंखा चालू होऊन त्यांना हवा मिळत आहे.

उन्हाळ्यात ऊन आणि घामाने लोक त्रासून जातात. विशेषत: रस्त्यावरून चालत जावे लागले तर ते आणखी कठीण होते. हा त्रास टाळण्यासाठी एका साधूने हा अनोखा जुगाड केला आहे. या जुगाडामुळे त्याच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश फार कमी प्रमाणात पडतो आणि हवाही मुबलक प्रमाणात मिळत आहे. या साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

उन्हात थंड वाऱ्याचा आनंद

धर्मेंद्र राजपूत यांच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या ट्विटमध्ये धर्मेंद्र लिहितात, बघितले का विनोद सौरऊर्जेचा योग्य वापर डोक्यावर सोलर प्लेट आणि पंखा लावून बाबाजी उन्हात थंड हवेचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओमध्ये साधू डोक्यावर पंखा घेऊन चालताना दिसत आहे. या पंख्याची दिशा त्याच्या चेहऱ्याकडे आहे, तर मागच्या बाजूला सोलर पॅन बसवण्यात आला आहे.व्हिडीओ बनवणाऱ्याने त्याला हा फॅन कशापासून कशापासून बनवला आहे, असे विचारले असता, तो उष्णता टाळण्यासाठी बनवण्यात आहे .सूर्य जितका तळपेल तितका हा पंख जास्त जोरात फिरेल असे साधूने सांगितले

असे आहे हा जुगाड

व्हिडीओ पाहिल्यानंतर साधूने हा जुगाड करत स्वतःचा फॅन बनवला आहे. यासाठी त्यांनी पिवळ्या रंगाचे हेल्मेट घेतले आहे, जे सहसा बांधकाम करताना घातले जाते. यामध्ये मागील बाजूस सोलर प्लेट लावण्यात आली आहे. यानंतर, हेल्मेटच्या समोर एक लहान आकाराचा पंखा अशा प्रकारे सेट केला जातो की त्याची हवा चेहऱ्यावर पडत राहते. अशाप्रकारे, कडक सूर्यप्रकाशातही, त्यांना उष्णता आणि घामाचा त्रास होत नाही.

Exit mobile version