‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील ‘अलार्म काकां’ची एक्झिट!

‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील ‘अलार्म काकां’ची एक्झिट!

मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे सोमवारी (२० सप्टेंबर) वृद्धपकाळाने निधन झाले. करमरकर हे ९६ वर्षांचे होते. विद्याधर करमरकर यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. परंतु त्यांना घराघरात खरी ओळख ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून मिळाली. विद्याधर करमरकर हे मराठी मनोरंज विश्वामध्ये करमरकर आबा म्हणून ओळखले जायचे.

केवळ मराठीच नाहीतर हिंदीतील काही चित्रपट आणि जाहिरांतीमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत दिसले होते.  करमरकर यांनी आतापर्यंत ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीया मनमर्जिया’, ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक सिनेमांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. करमरकर यांनी काम केलेले सिनेमेच नाही तर करमरकर यांनी काम केलेल्या जाहिराती देखील चांगल्याच गाजल्या आहेत. पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, इंडियन ऑइल, लेनेवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत करमरकर यांनी काम केले होते.

हे ही वाचा:

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

का आहे मुंब्रा दहशतवाद्यांचा अड्डा?

पुढील दोन दिवस राज्यात कोसळधारा!

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

विद्याधर करमरकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते मुंबईतील विलेपार्लेमध्ये राहत होते. त्यांनी सुरुवातीला नोकरी करुन आपली अभिनयाची आवड जोपासली होती. त्यानंतर अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले होते.

Exit mobile version