दूरदर्शनवर तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ वृत्तनिवेदन करणाऱ्या गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. दूरदर्शनवरील पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदकांपैकी त्या एक होत्या.
सन १९७१ मध्ये त्या दूरदर्शनवर रुजू झाल्या होत्या. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदनाचा पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट कार्य, योगदान आणि उत्तम कारकिर्दीसाठी त्या सन १९८९ मध्ये सर्वोत्कृष्ट महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. देणगीदारांची प्रमुख संस्था असणाऱ्या ‘वर्ल्ड वाइड फंड, भारत’ संस्थेच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
हे ही वाचा:
शतकवीर हेड आणि स्मिथची अडीचशे धावांची भागीदारी
पंतप्रधान मोदींनी शिक्षण घेतलेली शाळा बनणार ‘प्रेरणा स्थळ’
लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन
पु. ल. स्मृतीदिनानिमित्त रसिकांसाठी पर्वणी!
गीतांजली अय्यर यांनी कोलकात्याच्या लोरेटो कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला होता. दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, सरकारी संपर्क आणि मार्केटिंगच्या विविध विभागांत काम केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) मध्ये त्या सल्लागारही होत्या. तसेच, त्यांनी ‘खानदान’ या मालिकेतही काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.