ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान

आतापर्यंत मृत अनमोलने ८ रुग्णांचा जीव वाचवला आहे

ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान
भोपाळमध्ये क्रिकेटपटू अनमोल जैनचा ब्रेन डेड झाला आणि त्याच्या कुटुंबियांवर आभाळच कोसळले. पण त्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाच्या शरीरातील अवयवांचे दान करण्याचा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेतला.
अनमोल हा चांगला क्रिकेटर होता. तो डीबी मॉलमध्ये असलेल्या एका कंपनीत कामाला होता. “१७ नोव्हेंबर  रोजी झालेल्या अपघातात अनमोलच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलमध्ये उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड जाहीर केलं . त्यानंतर, अनमोलच्या कुटुंबाने त्यांच्या अंगांचे दान करून  इतर रोग्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला”, असे सिद्धांत रुग्णालयमधील चिकित्सा निर्देशक  सुबोध वाष्णे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार

राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर

आतापर्यंत मृत अनमोलने ८ रुग्णांचा जीव वाचवला आहे. कुणाला किडनी, तर कोणाला लिव्हर, कोणाला त्वचा तर कोणाला डोळे देऊन त्यांनी अनेकांचे  प्राण वाचवले आहेत. अनमोलच्या अवयव प्रत्यारोपणासाठी गुजरात, इंदूर आणि स्थानिक रुग्णालयात तीन ग्रीन कॉरिडॉर राबविण्यात आले. अनमोलचे हृदय विमानतळावर आणि लीव्हर इंदूरपर्यंत नेण्यासाठी हा ग्रीन कॉरिडॉर राबवण्यात आला. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे काही अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. भोपाळमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी तीन कॉरिडॉर राबविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे कळले आहे.
Exit mobile version