परिवारवादी पक्षांचे नेते आपला काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात. मी तर गरिबांना जन धन खाती उघडण्यासाठी आणि त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी मदत करतो. ‘परिवारवासी’ आलिशान घरात राहतात, तर गरिबांना पक्क्या घरात झोपायला मिळेल याची मी खात्री करतो. त्यांच्याप्रमाणे मी कधीही वैयक्तिक निवासस्थान बांधले नाही. माझे लक्ष आपल्या देशातील गरीब नागरिकांसाठी सुरक्षित घरे बांधण्यावर आहे. ‘परिवारवादी’नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी भारतातील संसाधने विकली. मी देशातील लोकांच्या मुलांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करत आहे, १४० कोटी भारतीय माझे कुटुंबीय आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तेलंगणामधील संगारेड्डी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
हेही वाचा..
रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज
केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी
आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!
आम्ही रामाचे शत्रू आहोत… द्रमुकचे ए. राजांनी गरळ ओकली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, परीवारवादी हे ‘फॅमिली फर्स्ट’वर विश्वास ठेवतात आणि माझा ‘नेशन फर्स्ट’वर विश्वास आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबच सर्वस्व आहे. माझ्यासाठी माझा देश सर्वस्व आहे. ते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी राष्ट्राचा त्याग करतात; मी राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वत:चे बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, विरोधक माझ्याबद्दल कुटुंब नसल्याचा मुद्दा उपस्थित करतात पण या देशातील १४० कोटी नागरिक हे मोदींचे कुटुंब आहे, हे ते विसरतात. देशातील प्रत्येक आई, प्रत्येक बहीण मोदींच्या कुटुंबाचा भाग आहे. देशातील प्रत्येक तरुण, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी मोदींच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे आज लाखो कुटुंबे म्हणत आहेत की ‘मैं हूं मोदी का परिवार’ असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी बीआरएस आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत या पक्षांकडे तेलंगणचा विकास करण्याची दृष्टी नाही. राज्यातील जनतेची तत्परतेने सेवा करण्यासाठी भाजप पूर्णपणे कटिबद्ध आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील आदिलाबाद येथे संबोधित करताना विरोधी आघाडी, भारतातील गटबाजी आणि भ्रष्टाचारावर निशाणा साधला. इंडी आघाडीचे नेते, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडलेले आहेत, चिंताग्रस्त होत आहेत. जेव्हा मी त्यांच्या ‘परिवार’वर प्रश्न विचारतो तेव्हा ते म्हणू लागले की मोदींना कुटुंब नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.