म्हणून कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

राज्य सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे कर्नाळा किल्ल्याची दुरावस्था.

म्हणून कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. ही बंदी का करण्यात आली आहे, त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत.

कर्नाळा किल्ल्याचा काही भागआता ढासळत चालला आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाणायास बंदी घालण्यात आली आहे. तशी सूचना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी वनविभाग ठाणेच्या वतीने लावण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी व इतिहास अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून किल्ल्यावरील भिंत ढासळत चालली आहे. तसेच लोखंडी रेलिंग ही वाकल्या आहेत.

पर्यटकांच्या दृष्टीने धोक्याचा असल्याने वन विभागाने पर्यटकांना प्रवेशास सक्त मनाई केली आहे. हा किल्ला वन विभागात येत असल्याने या किल्ल्याची राज्य संरक्षित स्मारकात किल्ल्याची नोंद आढळून येत नाही. कर्नाळा किल्ल्याची प्रवेशद्वार कमान व तटबंदी पडण्याच्या स्तिथीत आहेत.

किल्ल्यावर जाण्यासाठी रस्त्यातील वाटेमध्ये दरडी कोसळून भूस्खलनही होत आहेत व किल्ल्याच्या बुरुजाला तडे पडले आहेत. कर्नाळा किल्ला राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत नसल्यामुळे या किल्ल्याच्या दुर्ग अवशेष, पाण्याच्या टाक्या, बुरुज, तटबंदी आणि प्रवेशद्वार यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने डागडुजी होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे या किल्ल्याची डागडुजी व संवर्धनाची कोणतेही काम होत नाही. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेकडून राज्य पुरातत्व खात्यात नोंद व्हावी म्हणून, मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार करत आहेत, अशी माहिती पनवेल विभागातील सदस्य मयूर टकले यांनी दिली.

हे ही वाचा:

‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?

किल्ल्याच्या संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याची पडझड सुरु आहे. त्यामुळे किल्ल्याबाबतीत पर्यटक आणि गडप्रेमी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहेत. या किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धनासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी संस्थेचे पेण विभागाचे सदस्य रोशन टेमघेरे यांनी केली आहे.

Exit mobile version